' KALAGHAR ' Cene-Theatre Movement ACTORS GROWTH
KALAGHAR

 

 

TWO BATCHES EVERY SATURDAY FROM 3PM TO 5 PM AND 6PM TO 8 PM ,THROUGHOUT THE YEAR SAHAYOG MANDIR, THANE, AND ONE BATCH EVERY SUNDAY FROM 4PM TO 6 PM THROUGHOUT THE YEAR, LOKHANDWALA, ANDHERI, , WE ALSO CONDUCT ONE TO ONE COACHING ALL OVER INDIA Contact 9821330963

 
 
About Kalaghar | Workshop |   Dramas | Awards | Speciality | Achievements | Videos

 

 

 
 

 

 

 

 

 

Acting School
Dramas
Serials
Ad Films
Documentary

 

 

RASIKA OAK - JOSHI

Ramnath Tharwal’s Work Shop 20 Day–Giant’s Group of Vile Parle Workshop at Santacruz.

Drama-Skit "Ati Tethe Maati' Story-D.M.MIRASDAR* DIR. -RAMNATH THARWAL

Movie :  Gayab ,   Bhoot Uncle ,  Darna Zaroori Hai,  Malamaal Weekly  and
Johnny Gaddaar,   Billu Barber,  Blue Oranges,  Khalbali and many more

Drama : “ White Lily & Night Rider ” ,  “Yanda Kartavya Aahe“(2006).
Rasika in Bandini:
T.V. Serial :  “Bandini” She plays a negative character, Tarulata/ Motiben on NDTV
Imagine.

 

चतु:रस्त्र रसिका ओक


लिहायला वेळच  झालाय...
लेखणीच उचलत नव्हती
कारण ती माझी आवडती होती
फार वर्षांपूर्वी तिच्या इ. ९ ते १० वी च्या काळात माझ्या बालनाट्य शिबिरात ती आली
आ. दीपक सावंत यांनी Joints Group Off, Vile पार्ले या संस्थेतर्फे मुलांची अभिनय कार्यशाळा २२ वर्षापूर्वी आयोजित केली होती.
तारीख नक्की आठवत नाही.
त्यात २० ते २५ जणांचा भरणा होता.
काही तिच्या उंचीच्या मुली होत्या.
काही टिन्गु चिंगु मजेशीर होत्या.
शिबिरात ती आल्यानंतर
सगळ्याच नवीन विद्यार्थ्यांचे डोळे चकाकले
तिचं वेगळं उभं राहणं, वेगळं पाहणं आणि शुद्ध बोलणं
हा सगळ्यांचाच विषय बनला होता.
माझ्या मनात त्या ग्रुपमध्ये ती वेगळीच दिसल्यामुळे
मला माझ्या शिबिरात एक चांगली मुलगी आल्यामुळे, मी तिला विचारलं,
तू कुठून गं येणार ? तेव्हा ती म्हणाली, गोरेगाव वरून.
तेव्हा मी म्हणालो, गोरेगाव ते सांताक्रूझ अंतर लांब आहे.
तेव्हा ती म्हणाली, शिकण्यासाठी मी वाट्टेल तिथून येईन,
पण मी तुमच्याबद्दल ऐकल्यामुळे मला तुमचंच शिबीर करायचं आहे.
मलाही थोडंसं माझ्याबद्दल आश्चर्य वाटलं.
शिकवताना शिबिरातील सर्व गेम्सची ती राणीच असायची.
शिबीर संपवताना काही presentation बसवायची पाळी आली तेव्हा
द. मा.मिरासदारांची 'अति तिथं माती' ही गोष्ट निवडली.
शिबिरात मुलांपेक्षा मुलीच जास्त होत्या.
तेव्हा राजाचा रोल करायचा कोणी ?
असा मी विचारात पडलो आणि दोन मिनिटे गप्प बसलो.
सर्वांसमोर ती उठली आणि म्हणाली,
त्यात काय सर ? होउन जाईल,
त्यात चिंतेची बाब कसली ?
अगं, राजा हा मुलगा असायला हवा.
सर, त्यात काय ?
तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं ?
मी म्हटलं, "तू या शिबिरात एक चांगली अभिनेत्री दिसलीस."
"मग तर संपलं, च्यायला, राजाचा रोल मीच करणार !
आणि मी दोन मिनिटे विचार केला. 'च्यायला' या शब्दावर विचार केला.
राजाचा रोल हीच करणार.
सगळ्या मुलांनी होकार दिला
आणि तिने रोल ताब्यात घेतला.
समारोपाला संपूर्ण नाटकंच तिने ताब्यात घेतलं.
आणि हेच नाटक 'चन चन चुम' (चक्रम नगरीचा चक्रम नवाब चू महाराज)
या नावाने छबिलदासच्या आविष्कार चंद्रशाळेच्या मुलांना घेऊन सादर केलं आणि ते खूप गाजलं.
रसिकाने 'अति तिथं माती' या सादर केलेल्या फार्सिकल नाटकाचे स्वैर रुपांतर झालं होतं.
इथेच तिला मुलगा वा मुलगी हा भेदभाव मान्य नव्हता.
हे तिच्या पुढील वाटचालीवरून लक्षात येते.
तिच्या पासून मलाही काही नवीन गोष्टी समजल्या.
कारण ती improvization ची राणी होती.
ज्या आठवणी अजूनही माझ्या ताज्या आहेत.
Prithvi Theater ला मी जात असल्यामुळे,
शिबीर करत असल्यामुळे,
तिची Greips Theater ची नाटकं मी पाहत होतो.
यात ७ ते ८ वर्ष केव्हा निघून गेली हे कळलंच नाही.
ती संपूर्ण नाटक ताब्यात घेऊन
लहान मुलांना आणि मोठ्यांना हसवून सोडत होती.
नाटक संपल्यावर ती मला कॅन्टीनमध्ये येऊन मुद्दामहून विचारायची,
"काय सर ? नाटक कसं वाटलं ?"
मी सांगायचो मजा आली फक्त तुझ्या प्रत्येक भूमिकेत एकच गोष्ट जाणवते,
तू फक्त पोटावर रेलून उभी राहतेस व बोलताना थोडं तोंड वाकडं करतेस
हे चांगल्या कलाकाराला मारक आहे.
ते प्रत्येक नाटकात तसं दिसल्यामुळे ते वाईट दिसतं, हे तिच्याही लक्षात आलं होतं.
ती तुझ्या चेहऱ्याची style आहे की तुझ्या चेहऱ्याची ठेवणच तशी आहे
असा प्रश्न तिच्यासमोर उभा करायचो.
पुढच्या प्रयोगाच्या वेळी विचारायची,
"मी चुका सुधारल्या का ?"
तेव्हा मी म्हणायचो, "तू एक चांगली अभिनेत्री असल्यामुळे कमी करायचा प्रयत्न केला आहेस,
त्या नक्कीच सुधारल्या जातील आणि हळूहळू काही प्रमाणात सुधारल्या गेल्या.
बालनाट्यात काम केलं असल्यानमुले पुढे तिने प्रायोगिक नाटकात आपला एक वेगळा ठसा उमटवला होता.
व्यावसायिक नाटकात  प्रवेश केला आणि व्यावसायिक नाटकांची व्यावसायिक गणितंच बदलून टाकली.
व्यावसायिक रंगभूमीवर वेगवेगळ्या भूमिका केल्याने अभिनयाची  underacting आणि overactingचा बाज तिने व्यवस्थित सांभाळला.
आवश्यक असलेली overacting  तिने अनेक मराठी रंगभूमीवरील अभिनेत्रींना स्वतःकडे बघायला भाग पाडलं आणि जणू तिने इतरांना आव्हान दिलं.
इतकी ही चतुरस्त्र अभिनेत्री...
तिचे बालनाट्य, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक आणि सिनेमा आपल्या चतुरस्त्र अभिनयाने लोकांच्या लक्षात राहिले.
तिच्याबद्दल माझ्या सुखद आठवणी मला दीर्घकाळ लक्षात राहतील.
'Bhool Bhulaiya'  या सिनेमात माझी विद्यार्थिनी, 'विद्या बालन' बरोबर रुपेरी पडद्यावर तोडीस तोड काम करताना दिसली
तेव्हा  दोघींना एकत्र पाहून माझ्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू तरळले होते.

गेल्या वर्षभरात कॅन्सरने तिला ताब्यात घेऊन्सुद्धा तिने कॅन्सरला ताब्यात ठेवून 'White लिली आणि नाईट रायडर' हे नाटक लोकांच्या दीर्घ स्मृतीत लिहून ठेवलं.
माझी या चतु:रस्त्र अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली !
झाले बहु होतील बहु
परंतु या सम ही
असे कित्येक रसिक म्हणतील रसिकाला,
 "रसिका, तू तर चतु:रस्त्र अभिनेत्री !"
 

रामनाथ थरवळ

20th, july 2011

 

 

 

 

Copyright @ 2011 All Rights reserved..Ramnath Tharwal

Created & maintained by Sahara Network Solution & Dhruva Webhosting, email.sahararaut@yahoo.com/ www.sabmumbai.com / SMS - 9823975164